Pimpri news: शंभर कोटींच्या वसुलीचा टार्गेटचा आरोप मनाला न पटणारा : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
Pckhabar- राज्याचे गृहमंत्री सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला शंभर कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे देतील, टार्गेट दयायचेच असेल तर पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना देतील, त्यामुळे यामध्ये तथ्य वाटत नाही, जे अधिकारी चुकीचे काम करतात, त्यांनाच टार्गेट दिले जाते, असे पिंपरी -चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्पष्ट केले. तसेच पिंपरी चिंचवड शहर भयमुक्त करणे, हेच आमचे टार्गेट आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना दरमहा शंभर कोटी रुपयांचे टार्गेट दिले होते, असे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील एका कर्मचाऱ्यानेही काही दिवसांपुर्वी अशाप्रकारे एक पत्र दिल्याचे समोर आले होते. त्या पत्रात कोट्यवधी रुपयांच्या हप्ता वसुलीचा उल्लेख करण्यात आला होता. दरम्यान, मुंबई पोलिस दलातील शंभर कोटी वसुलीच्या पत्राबाबत कृष्ण प्रकाश यांना पत्रकारांनी त्यांना विचारले असता ते म्हणाले, जे अधिकारी चुकीची कामे करतात, त्यांनाच असे टार्गेट दिले जाते.
चुकीची कामे न करणाऱ्या अधिकार्यांना टार्गेट कसे दिले जाईल. चुकीची कामे करतात म्हणून तर त्यांना टार्गेट दिले जाते. सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला असे टार्गेट दिले जाऊ शकत नाही. टार्गेट द्यायचेच असेल तर आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला देतील. त्यामुळे गृहमंत्री सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला टार्गेट देणे म्हणजे हे मनाला न पटणारे आहे.
तसेच पिंपरी -चिंचवड शहरातील वसुलीबाबतच्या व्हायरल पत्राचा तपास ‘सीआयडी’कडे असल्याने त्यावर आपण भाष्य करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.







Leave a Reply