Pimpri News: शहरात शनिवार, रविवार जनता कर्फ्यू लावा – महापौर ढोरे
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात रुग्णसंख्या वाढत असल्याने कडक निर्बंध करण्याची आवश्यकता असून येत्या शनिवारी आणि रविवारी शहरात जनता कर्फ्यू लागू करावा अशी सूचना महापौर उषा ढोरे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे.
रुग्णवाढत असतानाही मार्केटमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. चौकांमधील गर्दी कमी होताना दिसून येत नाही. चौकांमध्ये जमावबंदी लावावी. नागरिकांना बंधने घातली पाहिजेत. त्यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी कर्फ्यू करावा अशी सूचना आयुक्तांना केली आहे”.
दरम्यान, जिल्हाधिका-यांशी बोलून जनता कफ्यूबाबत निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.










Leave a Reply