Dehu Corona news: देहूगाव परिसरात 9 नवे रूग्ण
Pckhabar-देहूगाव परिसरात सोमवारी कोरोनाच्या 9 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. एकाही रूग्णांला डिस्चार्ज देण्यात आला नाही, अशी माहिती देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ञ डॉ. किशोर यादव यांनी दिली.
देहूगाव परिसरात आत्तापर्यंत 1 हजार 266 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 हजार 209 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 20 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
37 कोरोना बाधित रूग्णांमध्ये 24 रूग्ण गृह विलगीकरणात असून कोविड सेंटरमध्ये चार रूग्ण तर खासगी रूग्णालयात 9 रूग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती डॉ. यादव यांनी दिली.










Leave a Reply