Talegaon Dabhade news: कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमा : विरोधी पक्षनेते गणेश काकडे
Pckhabar- तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेमध्ये कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक त्वरीत करावी, अशी मागणी तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांच्याकडे केली आहे.
काकडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांची बदली होऊन सुमारे तीन महिने झाले आहेत. त्यामुळे रिक्त पदावर नवीन कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक झाली नसल्याने सर्वच प्रशासकीय कामांना खीळ बसली असल्याचे काकडे यांनी नमूद केले आहे.
तसेच कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने धोरणात्मक निर्णय घेण्यास मर्यादा येत आहेत.
मागील आठवड्यात मुख्यधिकारी नसल्याने अग्निशमन बंबात डिझेल नसल्याची घटना घडली होती, तसेच पाणी पट्टी बिलाबाबतचा निर्णय मुख्याधिकारी नसल्याने प्रलंबित राहिला असल्याचेही म्हटले आहे.
मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक त्वरित करावी त्यात कोणीही राजकारण करू नये असे गणेश काकडे यांनी या वेळी नमूद केले. स्वच्छ सर्वेक्षण या शासनाच्या उपक्रमात तळेगाव नगर परिषदेला अव्वल स्थानी नेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी हातभार लावण्याचे आवाहनही विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी केले आहे.










Leave a Reply