Dehu news : दोन एकरात ३०० पोती बटाट्याचे विक्रमी उत्पन्न

Dehu news : दोन एकरात ३०० पोती बटाट्याचे विक्रमी उत्पन्न
Pckhabar- देहूगावातील प्रगतशील शेतकरी गोविंदराव बाळू हगवणे यांनी दोन एकर शेतीमध्ये सुमारे ३०० पोती बटाट्याचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे. यामुळे हगवणे यांचे परिसरात कौतुक होत आहे.

दिवसेंदिवस हवामानातील प्रतिकूल परिस्थिती मुळे शेतीत उत्पन्न कमी होते चालले आहे. सोबतच शेतीत काम करण्यासाठी मजूर मिळत नसताना आणि मिळाले तरी मजुरी दर दिवसेंदिवस वाढतच गेली. यामुळे बहुतेक शेतकरी हवालदिल झाले आहेत, असे असताना प्रतिकूल परिस्थितीत प्रगतशील शेतकरी गोविंदराव बाळू हगवणे यांनी दोन एकर शेतीमध्ये सुमारे ३०० पोती बटाट्याचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे.

त्याबद्दल हगवणे यांचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. प्रवीण हगवणे देहू शहर उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा यांचे वडील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *