Pimpri news: लायन्स क्लब ऑफ पूना निगडी व किवळे ग्रामस्थांनी राबविले पवनामाई स्वच्छता अभियान

Pckhabar-किवळे घाटावर जलपर्णीने पवनामाई पूर्णपणे व्यापून टाकली आहे. किवळे ग्रामस्थांना डास व उग्र वासाचा सामना करावा लागत आहे. किवळे घाट जलपर्णीमुक्त करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ पूना निगडी आणि ग्रामस्थांनी रविवारी दोन ट्रक जलपर्णी काढून घाट स्वच्छ केला.
यावेळी लायन मीनांजली व दिलीपसिंह मोहिते, अशोक येवले, वसंत देशपांडे, राजीव कुटे, चंद्रशेखर पवार,अजितकुमार देशपांडे, ऋषिकेश मुसमाडे राजेंद्र तरस, नवनाथ तरस अशोक तरस, निलेश साळूंके आणि इतर ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
दोन ट्रक जलपर्णी ग्रामस्थ व लायन्स सदस्यांनी किवळे घाटातून बाहेर काढली. नदीतून घाटापर्यंत जलपर्णी ढकलण्याचे जिकरीचे काम युवकांनी केले. यासाठी पालिकेची बोट व नाविक मिळाल्यास जलपर्णी सहजतेने काढली जाऊ शकते अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. लायन्स क्लब त्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करेल असे आश्वासन अध्यक्ष लायन मारुती मुसमाडे यांनी ग्रामस्थांना दिले. ही मोहीम दर रविवारी घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.










Leave a Reply