Dehu Corona news: देहूगाव परिसरात 28 सक्रीय रूग्ण
Pckhabar-देहूगाव परिसरात कोरोनाचे 28 रूग्ण सक्रीय आहेत. आज सात रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकाही नवीन रूग्णांची नोंद झाली नाही, अशी माहिती देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ञ डॉ. किशोर यादव यांनी दिली.
देहूगाव परिसरात आत्तापर्यंत 1 हजार 257 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 हजार 209 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 20 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
28 कोरोना बाधित रूग्णांमध्ये 18 रूग्ण गृह विलगीकरणात असून कोविड सेंटरमध्ये एक रूग्ण तर खासगी रूग्णालयात 9 रूग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती डॉ. यादव यांनी दिली.










Leave a Reply