Talegaon Dabhade news: स्वीकृत नगरसेवकपदी संतोष दाभाडे, समीर खांडगे

Talegaon Dabhade news: स्वीकृत नगरसेवकपदी संतोष दाभाडे, समीर खांडगे
Pckhabar- तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी भारतीय जनता पक्षाचे संतोष हरिभाऊ दाभाडे तर जनसेवा विकास समितीचे समीर हरिश्चंद्र खांडगे यांची आज गुरुवारी निवड करण्यात आली.

नगरपरिषदेच्या विशेष सभेचे पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी काम पहिले. त्यांना सहाय्यक म्हणून उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी सहकार्य केले.

नगरसेवकपदी निवड झालेले दाभाडे हे तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष असून ते राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाच्या माध्यमातून आषाढीवारीमधील निर्मलवारीमध्ये  प्रमुखपदावर काम करत आहेत. तर खांडगे हे तळेगाव स्टेशन परिसरामध्ये जागृती मंडळाचे विश्वस्त तसेच श्री मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक म्हणून काम पाहत आहेत. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फुले, भंडारा उधळून तसेच पेढे वाटून, फटाके फोडू आनंद व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *