Covid Vaccine News: कोविड लसीकरणबद्दल शंका आणि निरसन
Pckhabar- जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. कोरोनामुळे लाखो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशातच भारतात सीरम आणि भारत बायोटिक कंपनीने उत्पादित केलेल्या लसीमुळे एक प्रकारची कोरोनावर मात करण्यासाठी नवसंजीवनी मिळाली आहे. मात्र, या कोविड लसीकरणाबद्दल नागरिकांमध्ये शंका आहेत. या शंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न राज्य आरोग्य विभाग वेळोवेळी करत आहे. त्यानंतरही अनेक नागरिकांना लसीकरणाबद्दल शंका आहेत, या शंकाचे निरसन करण्याचा आपण प्रयत्न करू यात.
याबाबत देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ञ डॉ. किशोर यादव म्हणाले, कोेरोनावर मात करण्यासाठी सध्या तरी लसीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. लसीचे कोणतेही दुष्यपरिणाम नाहीत. त्यामुळे जे नागरिक लस घेण्यासाठी पात्र आहेत. त्यांनी न घाबरता लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी न चुकता दुसरा डोस घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
लस का घ्यावी?
कोरोनामुळे 100 लोकांमध्ये 2 ते 4 मृत्यु होत आहेत. लसीकरणामुळे दुष्परिणाम झाला तरी तो लाखात 1 इतके कमी प्रमाणात आहे आणि तो सुध्दा प्राणघातक असेल असे नाही. म्हणून आजार उद्भवण्यापेक्षा लसीकरण करणे जरूरी आहे.
लसीकरणाची कार्यक्षमता आहे का?
सर्व मंजूर लसींमध्ये कोविडमुळे मृत्युपासून बचाव करण्यासाठी 100 टक्के कार्यक्षमता आहे. गंभीर कोविडच्या विरूध्द अत्यंत उच्च कार्यक्षमता व रोगप्रतिकारक क्षमता आहे.
लस सुरक्षित आहे का?
सर्व लसी पुर्णपणे सुरक्षित आहेत.
आम्हाला कोणती लस मिळणार? पर्याय आहे का?
आता तरी सगळीकडे कोविशिल्ड सिरम, पुण्याची लस उपलब्ध आहे. काही सेंटरमध्ये कोवाक्सिन आहे पण दोन्ही लसी अतिशय सुरक्षित आहेत त्यामुळे नामको लसीकरण सेंटरला जे उपलब्ध आहे ते घ्या.
दुसर्या टप्प्यात कोण-कोण लस घेवू शकते?
60 वर्षावरील प्रत्येक व्यक्ती आणि 45 वर्षावरील गंभीर आजार असलेल्या व्यक्ती जसे कॅन्सर, किडनीचे आजार इ. यांना आपल्या जवळच्या सेंटरमध्ये लस घेता येईल. त्यासाठी कोविन अॅप वर नोंदणी करावी अथवा नामको लसिकरण केंद्रामध्ये येवून नोंदणी करावी.
लस घेतल्यानंतर काय दुष्परिणाम होवू शकतात?
ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, उलटी, अशक्तपणा हे सर्व सामान्य दुष्परिणाम साधरणपणे दिसतात. ते 1 ते 2 दिवस राहतात. साध्या पॅरासिटामोल/क्रोसीन या औषधाने बरे वाटते. काहींना तर काहीच लक्षण दिसत नाहीत. वरीलपैकी काहीही त्रास झाल्यास घाबरण्याचे कारण नाही. हे शरीराची प्रतिकार शक्ती कार्यान्वीत झाल्याचे लक्षण आहे.
लस घ्यायला जाण्यापूर्वी काय तयारी करावी?
लस घ्यायला शक्यतो भरल्यापोटी जावे. उपाशीपोटी जावू नये. लसीकरण सेंटरवर कमी जास्त वेळ लागु शकतो त्यामुळे पाण्याची बाटली, कोरडा खाऊ, बिस्कीटे, कोकम सरबत किंवा लिंब सरबत घेवन जावे. तसेच जातांना सोबत आधारकार्ड व पॅनकार्ड घेवून जावे.
लस किती वेळा घ्यावे?
पहिला डोस घेतला की साधारणपणे 28 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा.
कॅन्सर व इतर आजाराच्या रूग्णांनी लस घ्यावी का?
नक्कीच, फक्त आधी आपल्या कॅन्सर तज्ञांचा सल्ला घ्यावा व कोविडचे लसिकरण करून घ्यावे.
हृदयरोग, मूत्रपिंडाचा रोग, प्रत्यारोपण, संधिवात स्टिरॉइड घेणार्या लोकांनी लस घ्यावी का?
100 टक्के…. मुळात लस याच लोकांसाठी बनली आहे ज्यांना असे आजार आहेत. फक्त लस घेण्यासाठी योग्य तो कालावधी कोणता हे कळावे म्हणून वरील रूग्णांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्याने लसीकरण करावे.
अॅलर्जीक ब्रोन्कायटीस (दमा) असलेल्या लोकांनी लस घ्यावी का?
नक्कीच घेऊ शकता परंतु अॅलर्जी खूप तीव्र असेल तर त्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कोविड होवून गेल्यावर पण लस घ्यावी का?
हो 100 टक्के कारण कोविड नंतर बनणार्या प्रतिकार क्षमता कालांतराने नष्ट होतात. लसीने मिळणारी प्रतिकार क्षमता जास्त कालावधी पर्यंत राहतात.
नुकताच कोविड झाला असेल तर लस कधी घ्यावी?
कोविड होवून गेल्यावर 8 ते 12 आठवडयांनी लस घ्यावी
मी सर्व नियम पाळतो मला वर्षभरात कोरोना झाला नाही, माझी प्रतिकारकशक्क्ती चांगली ओ. तरी मी लस घ्यावी का?
हो… 100 टक्के
लहान मुलांना लस दयावी का?
16 वर्षाखालील मुलांना देवू नये.
गर्भवती महिलांना लस दयावी का? सध्या त्याचा डेटा उपलब्ध नाही त्यामुळे सध्या तरी देवू नये
लस घेतल्यावर पण मास्क लावावे लागणार का?
हो. लसिकरण नंतरही हलगर्जिपणा करून चालणार नाही. मास्क, सॅनिटायझर हे वापरणे गरजेचे आहे.
लस नंतर 100 टक्के कोरोना होणार नाही का?
असे अजिबात नाही पण झाला तरी तो सौम्य असेल.
लस घेतल्यावर पण मास्क लावावे लागणार का?
हो. लसीकरण नंतरही हलगर्जिपणा करून चालणार नाही. मास्क, सॅनिटायझर हे वापरणे गरजेचे आहे.
जर लस घेवूनही कोरोना होणार असेल तर लसीचा हेतू काय?
कोविडची दुसरी लाट टाळणे.
मृत्यू दर कमी करणे.
गंभीर रूग्णांचे प्रमाण कमी करणे
लस घेतल्यावर रोग प्रतिकारक शक्ती कधी तयार होणार?
पहिल्या डोस घेतल्यानंतर 45 दिवसानंतर रोग प्रतिकारक शक्ती तयार होते पण त्यासाठी 28 दिवसानंतर दुसरा डोस घेणे गरजेचे आहे.










Leave a Reply