Pimpri news: जलपर्णी गळ्यात घालून नगरसेवक भोसले महापालिकेत
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना आणि इंद्रायणी नदीतील वाढत्या जलपर्णीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना नगरसेवक सचिन भोसले यांनी गळ्यात जलपर्णी घालून महापालिका सभेच्या मुख्य सभागृहासमोर ठिय्या मांडला. त्यामुळे भोसले यांना सभागृहात सुरक्षा रक्षकांनी येऊ दिले नाही. यावेळी त्यांची सुरक्षारक्षकांसोबत झटापट झाली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सभा आज (गुरुवारी) आयोजित केली आहे. उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत.जलपर्णी काढायला लावून भोसले यांना सभागृहात येण्याची परवानगी देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहरात पवना, इंद्रायणी या दोन नद्या आहेत. दोन्ही नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी झाली आहे. त्यामुळे पाण्याचे प्रदुषण होत आहे. नदीकाठी राहणा-या नागरिकांना दुर्गंधी, डासांचा त्रास होत आहे.
अनेक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महासभेत देखील प्रशासनाला कल्पना दिली होती. परंतु, त्यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले, असे नगरसेवक भोसले यांनी सांगितले.










Leave a Reply