Maval news: मावळातील आठ शाळांना पुस्तकांचा संच वाटप

Maval news: मावळातील आठ शाळांना पुस्तक संच वाटप
Pckhabar- मावळ तालुक्यातील वारू केंद्रातील आठ शाळांना पुण्यातील ’वाचनवेड संस्थेच्या वतीने आणि देहूतील अभंग प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून प्रेरणादायी पुस्तकाचा संच वाटप करण्यात आला.

मावळातील कोथुर्णे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी जेष्ठ साहित्यिक दादाभाऊ गावडे पोलिस अधिकारी गणेश टिळेकर, विस्ताराधिकारी रामराव जगदाळे, शिवाजीराव ढोल, अभंग प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सुरेश गाडे, सचिव सलीमभाई मुलाणी अभंग प्रतिष्ठानचे सदस्य, शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.

  विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने वाचनवेड संस्थेच्या माध्यमातून अभंग प्रतिष्ठानच्या वतीने मावळातील अनेक शाळांचा प्रेरणादायी पुस्तकांचा संच वाटप करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *