Pimpri Corona news: भय इथले संपत नाही… कोरोना रूग्ण संख्येने हजारी ओलांडली

Pimpri Corona news: भय इथले संपत नाही… कोरोना रूग्ण संख्येने हजारी ओलांडली
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. बुधवारी एकाच दिवशी 1 हजार 248 नवे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आज पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 615 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात 1 लाख 16 हजार 896 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 7 हजार 96 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 888  तर हद्दीबाहेरील 792 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी 6 हजार 930 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 5 हजार 472 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला.
1 हजार 506 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 525 घरांना भेटी देऊन 5 हजार 583 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.  शहरात बुधवारअखेर 76 हजार 813 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोना रूग्ण संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे
नागरिकांनी मास्क, सुरक्षित अंतर, गर्दीत जाणे टाळणे, सॅनिटायझरचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहन महापलिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *