Pimpri news: शहर परिसरात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ; पोलिसांच्या कारभार प्रश्नचिन्ह

Pimpri news: शहर परिसरात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ; पोलिसांच्या कारभार प्रश्नचिन्ह
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात आणि परिसरात वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज सरासरी सात वाहने चोरीला जात आहेत. तर
वाहन चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना मात्र अपयश येत असून पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गेल्या दोन महिन्यात तब्बल 222 वाहने चोरीला गेली आहे.

जानेवारी महिन्यात 126 वाहने चोरीला गेली. तर फेब्रुवारी महिन्यात 96 वाहने चोरीला गेली आहेत. दोन महिन्यात तब्बल 222 वाहने चोरीला गेली आहेत. यामध्ये  204 दुचाकी, 4 तीनचाकी आणि 14 चारचाकी वाहनांचा समावेश आहे. यातील केवळ 21 वाहने शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. हे प्रमाण केवळ 9 टक्के असून 91 टक्के वाहने अजूनही पोलिसांना सापडलेली नाहीत. त्यामुळे पोलीस फक्त हप्तेखोरीत दंग असून वाहन चोरटे पोलिसांवर भारी पडत असल्याचे दिसून येत आहे.

मंगळवारी चाकण, चिखली आणि वाकड मधून तीन दुचाकी वाहने चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

माणिक दत्तू पवार (वय 46, रा. खराबवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची (एम एच 14,  ई के 4237) ही 20 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराजवळून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. विशाल श्रीमंत जगदाळे (वय 28, रा. चिंचेचा मळा, चिखली) यांची 30 हजारांची दुचाकी (एम एच 25, ए आर 0364) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर आकाश अर्जुन शिंदे (वय 27, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 15 हजारांची दुचाकी काळेवाडी येथील धनगर बाबा मंदिरासमोरून चोरट्यांनी चोरून नेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *