RTE News: ऑनलाइन अर्ज भरण्यास तांत्रिक अडचण, पालकांना मनस्ताप
Pckhabar-शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश घेण्यासाठी (RTE) ऑनलाइन अर्ज भरणे सुरू आहे. मात्र, अर्ज भरताना पालकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. संकेतस्थळ व्यवस्थित चालत नसून, मोबाईलवर ‘ओटीपी’ येत नसल्याने अर्ज भरताना अडचणी येत आहे. यामुळे पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
यंदा प्रवेश घेण्यासाठी 3 मार्चपासून अर्ज भरणे सुरू झाले आहे. परंतु, 3 मार्चपासूनच तांत्रिक अडचणी सुरु होत्या. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर दुसऱ्या दिवशी संकेतस्थळ संथगतीने चालत असल्याने अर्ज भरताना वेळ लागत असल्याचे दिसून आले होते. ओटीपीची तांत्रिक अडचण आलेली आहे, ती दूर करण्याचे काम सुरु आहे. तोपर्यंत पालकांनी अर्ज भरू नयेत.ओटीपीची तांत्रिक अडचण दूर झाल्याची सूचना संकेतस्थाळावर दिली जाईल, असे संदेश संकेतस्थळावर टाकण्यात आला आहे.
प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरण्यासाठी महापालिकेने शहरात दहा ठिकाणी मदत केंद्र सुरू आहेत. काही पालक मदत केंद्रावर अर्ज भरत आहेत. तर काही जण वैयक्तिकरित्या अर्ज भरत आहेत. अर्ज भरण्याचा कालावधी 21 मार्चपर्यंत आहे. यंदा जाहीर झालेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेला उशीर झाला आहे. शाळा नोंदणीला चार वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे पुढील प्रक्रियेला उशीर होण्याची शक्यता आहे.
एका विद्यार्थ्यांचा एकच अर्ज भरावा, एकपेक्षा जास्त केल्यास अर्ज रद्द करण्यात येतो. अर्ज भरताना चुकल्यास तो रद्द करून पुन्हा भरावा. अर्ज भरल्यावर प्रिंट काढून ती जवळ ठेवावी. अर्ज भरण्याअगोदर आवश्यक कागपत्र जवळ ठेवावे. अर्ज भरताना काही अडचणी आल्यास किंवा अर्ज भरण्यासाठी मदत केंद्रावर जावे.
याबाबत निगडीतील माॅडर्न महा ई सेवा केंद्राचे संचालक अमरदिप यादव म्हणाले, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून OTP ची तांत्रिक अडचण आलेली आहे. पालक वारंवार महा ई सेवा केंद्रावर येऊन विचारणा करत आहेत. 21 मार्चपर्यंत अर्ज भरण्याची शेवटी तारीख आहे. त्यामुळे आपल्या पाल्यांचा अर्ज भरला जाईल की नाही, अशी त्यांना भिती वाटत आहे. त्यामुळे अर्ज भरण्यास तारीख वाढवून देण्याची मागणी पालक करत आहेत.










Leave a Reply