Pune news: “बॅक बचाओ – देश बचाव” युनायटेड फोरम ऑफ बॅक युनियनच्या संपास शंभर टक्के प्रतिसाद

Pckhabar- युनायटेड फोरम ऑफ बॅक युनियनने बॅक खाजगीकरणा विरोधात दिनांक 15 व 16 मार्च 2021 रोजी पुकारलेल्या संपास Pune जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बॅक शाखांचा 100 टक्के प्रतिसाद मिळाला.
Pune जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने करून, “बॅक बचाओ – देश बचाव” च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी या संपास सर्व प्रवर्गातील जनतेने पाठींबा दयावा अशी विनंती बैंक सदस्यांकडून करण्यात आली. देशाच्या प्रगतीमध्ये सार्वजनिक बैंकांचे योगदान हे मौल्यवान असून त्यांच्या योगदानास दुर्लक्षित करता येणार नाही, असे नागरिकांचे मत आहे.
तसेच सरकारने या सार्वजनिक बॅका खाजगीकरण्या ऐवजी मोठ्या थकबाकीदार उद्योजकांवर कठोर कारवाई करून वसूल करावीत, अशी मागणी जोर पकडू लागली आहे. या सर्व गोष्टी पाहता सार्वजनिक बॅक खाजगीकरणास बॅक स्टाफ व सर्वसामान्य जनता यांचा कडाडून विरोध होत आहे.
या संपामध्ये कॉम्रेड Krishna Panchal, Rohit Shrivastav, Sachin Gosavi, Dhannajay Sathe यांच्या नेतृत्वाखाली कोरोना साथीच्या रोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून हा संप यशस्वी करण्यात आला.











Leave a Reply