Pimpri Corona news: शहरात कोरोनाचे 734 नवे रूग्ण
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी कोरोनाचे 734 नवे रूग्ण सापडले आहेत. चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 673 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात 1 लाख 14 हजार 754 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 5 हजार 929 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 880 तर हद्दीबाहेरील 790 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी 2 हजार 919 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 3 हजार 24 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला.
1 हजार 315 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 611 घरांना भेटी देऊन 6 हजार 351 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरात सोमवारअखेर 68 हजार 234 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.










Leave a Reply