Dehu News: ‘बिर बिलिंग मॅरेथॉन 2021’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुजा बुधावले यांना रसिकाताई काळोखे यांच्याकडून अर्थसहाय्य

Dehu News: ‘बिर बिलिंग मॅरेथॉन 2021’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुजा बुधावले यांना रसिकाताई काळोखे यांच्याकडून अर्थसहाय्य
Pckhabar- हिमाचल येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रँड इंडियन ट्रेल्सतर्फे
‘बिर बिलिंग मॅरेथॉन 2021’ या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी देहूतील पुजा बुधावले यांना महालक्ष्मी बचत गटाच्या अध्यक्षा रसिकाताई स्वप्निल काळोखे यांनी आर्थिक सहकार्य केले.

हिमाचल येथे 11 एप्रिल रोजी ‘बिर बिलिंग मॅरेथॉन 2021’ ही स्पर्धा होणार आहे.

पुजा बुधावले यांनी The jumpping gorila trail run – २०२१ या स्पर्धेसह  कात्रज to सिंहगड १६ km – 2016 च्या Runner Up, Female Sinhagad Half Vertical 11 KM First Place, 100 KM Cycling 2018 Winner, 20 KM Trekking, Irshalgad Trekethon 2017  Second Place आणि काश्मीर ते कन्याकुमारी सायकलिंग 2017 या स्पर्धेत यश संपादन केले आहे.

याबाबत महालक्ष्मी बचत गटाच्या अध्यक्षा रसिकाताई स्वप्निल काळोखे म्हणाल्या, ”क्रीडा क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या क्रीडापटू पुजा बुधावले हिला जागतिक महिला दिनानिमित्त आर्थिक निधी देऊन स्पॉन्सरशिप करताना मनस्वी आनंद होत आहे.”

देहूगावचे आदर्श उपसरपंच स्वप्नील आप्पा काळोखे आणि महालक्ष्मी बचत गटाच्या अध्यक्षा रसिकाताई स्वप्निल काळोखे यांनी पूजा बुधावले यांच्या उत्तुंग कमिगिरी आणि यशासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *