Chinchwad news: कोरोना लसीकरण केंद्र वाढवा: मंगला कदम
Pckhabar- पिंपरी चिंचवड महापालिकेने कोरोना लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ करावी, अशी मागणी नगरसेविका मंगला कदम यांनी केली आहे. त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे.
कदम यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मागील दोन महिन्यापासून पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणू संसर्गांचे रुग्ण वाढत आहेत. मागील काही दिवसापासून दररोज पाचशे सहाशे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. काल तर आठशे बावीस कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व मनपा प्रशासन कडक निर्बध लागू करण्यात येणार आहेत. सध्या कोरोनाची लसीकरण चालू करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरीकांना प्रथम प्राधान्याने लस देत आहे. परंतु मनपाच्या रुग्णालयात ज्येष्ठ नागरीक गर्दी करीत आहेत. तसेच त्यांना बराच काळ तिष्ठत बसावे लागत आहे, काहिंना लस न घेता घरी जावे लागत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरीकांमध्ये नाराजीची भावना निर्माण होत आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गांच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या बाह्यरुग्ण विभाग तसेच जिथे शक्य असेल तिथे शहरात ठिकठिकाणी लसीकरण केंद्र त्वरीत चालू करुन ज्येष्ठ नागरीकांना दिलासा देण्याची गरज आहे. तरी मनपाच्या बाह्यरुग्ण विभागात तसेच शहरात जिथे शक्य असेल तिथे त्वरीत कोरोना लसीकरण केंद्रे चालू करण्यात यावीत.










Leave a Reply