Pimpri news: उन्हाचा चटका वाढला ; माठांच्या मागणीत वाढ

Pimpri news: उन्हाचा चटका वाढला ; माठांच्या मागणीत वाढ
Pckhabar- मार्च महिना सुरू होताच पिंपरी-चिंचवड शहर परिसरात उन्हाचा चटका वाढायला आहे. त्यामुळे शीतपेये आणि थंड पाण्यासाठी माठांची मागणी वाढली आहे. शहरात ठिकठिकाणी माठांची विक्री होत आहे.
घरातील फ्रिजमधील पाणी पिल्याने सर्दी, खोकला, डोकेदुखी आणि घशाचे आजार उद्भवत आहेत. सोबतच कोरोना सारखा आजार शहरात पसरत चालला आहे. या भितीने नागरिक फ्रिजमधील पाणी न पिता माठातील पाणी पिण्यास प्राधान्य देत आहेत.
_ लहान, मध्यम आणि मोठ्या आकारात माठांची विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. दीडशे रूपयांपासून साडेपाचशे रुपयांपर्यंत माठाची किंमत आहे. चिकण मातीपासून तयार करण्यात आलेल्या या माठांमधून पाणी झिरपण्याचे प्रमाण कमी असते. यामध्ये काळ्या माठांस अधिक पसंती असल्याचे  नागरिकांनी सांगितले.
शीतपेयांमध्ये सरबत, लस्सी, ताक, ज्यूस, फळं याशिवाय विविध कंपन्यांची तयार शीतपेय घेण्यावर नागरिक भर देत आहेत. दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत असून नागरिकांची पाऊले रसवंती गृहांकडे वळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *