Wakad crime news:  वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की, आरोपीला अटक  

Wakad crime news:  वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की, आरोपीला अटक
Pckhabar-जमिनीची मोजणीसाठी आलेल्या अधिकार्‍यांना आणि  पोलिसांना सुचना देणार्‍या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला एका ज्येष्ठ नागरिकाने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच मारण्यासाठी अंगावर धावून येत त्यांच्या पिस्तूलची कॉर्ड ओढून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार वाकड येथे गुरूवारी घडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

विजय निवृत्ती वाघमारे (वय-60, रा. वाकड गावठाण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार दिपक नामदेव गायकवाड (वय-49) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपीने वाकड येथील सर्व्हे नं. 167/9 येथे बेकायदेशीरपणे जागेवर ताबा केला होता. याठिकाणी मंडल अधिकारी जमिनीची मोजणी करण्यासाठी आले होते. आरोपीने केलेला बेकायदेशीर ताबा काढू नये, यासाठी आरोपीने मोजणी अधिकारी आणि पोलिसांनी शिवीगाळ केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलिसांना सुचना देत असताना आरोपींने त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्यांचा अंगावर धावून जात त्यांच्या पिस्तूलची कॉर्ड ओढून आरडा-ओरड करत शासकीय  कामात अडथळा निर्माण केला. वाकड पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *