Pimpri news: शहरात आज 468 कोरोना रूग्ण

Pimpri news: शहरात आज 468 रूग्ण कोरोना

Pckhabar-  पिंपरी-चिंचवड शहरात 453 तर हद्दीबाहेरील 15 असे 468 नवे रूग्ण सापडले आहेत. तर तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरवासियांनी भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरात 1 लाख 4 हजार 503 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 99 हजार 510 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 836 तर हद्दीबाहेरील 772 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुरूवारी 2 हजार 186 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 2 हजार 912 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 534 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 656 घरांना भेटी देऊन 1 हजार 936 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *