Chinchwad news: 11 कोरोना रूग्ण सापडल्याने ‘ती’ सोसायटी सील
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. चिंचवड येथील श्री मोरया गोसावी राज पार्क या सोसायटीत बुधवारी 11 रुग्ण कोरोना रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे महापालिकेने ही सोसायटी सील केली आहे.
शहरात बुधवारी एकाच दिवशी तब्बल 425 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरवासियांनी भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात 1 लाख 4 हजार 50 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 99 हजार 53 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 833 तर हद्दीबाहेरील 772 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.










Leave a Reply