Sangli News: वसुंधरा संजय जाधव यांचे निधन
Pckhabar-वसुंधरा संजय जाधव यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 64 वर्षांच्या होत्या.
मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी बुधवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला. वसुंधरा जाधव यांचे निधन झाल्याने जाधव कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातू असा परिवार आहे. त्यांच्यावर मुळगावी सांगली, कडेगाव तालुक्यातील असद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते कै. महिपतराव मोहिते यांच्या त्या जेष्ठ कन्या होत्या.










Leave a Reply