Chinchwad news: महापौरांच्या मुलावर गुन्हा दाखल
Pckhabar-कोरोना साथीच्या अनुषंगाने शासनाचे नियमाचे पालन न करता ’फॅशन शो’चे आयोजन केल्याप्रकरणी महापौर उषा ढोरे यांच्या मुलासह अन्य 30 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जवाहर मनोहर ढोरे (रा. मल्हार गार्डन, नवी सांगवी) यांच्यासह अन्य लोकांवर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महापालिकेतर्फे महादेव मारूती शिंदे (वय-54, रा. नेहरूनगर) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने निर्बंध जाहीर केले असताना भाजपच्या महापौर माई ढोरे यांच्या मुलाने सोमवारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ’फॅशन शो’ कार्यक्रमाचे आयाजन केले होते. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी, नागरिकांनी सुरक्षित अंतर, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. महापौरांसह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक यांच्यासह अनेकांनी मास्क घातले नव्हते. त्यामुळे कोरोनाचे नियम मोडल्यामुळे महापौरांच्या मुलासह इतर नागरिकांवर 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.










Leave a Reply