Pimpri news: बेजबाबदार वागणाऱ्या महापौरांनी राजीनामा द्यावा: माजी महापौर मंगला कदम

Pimpri news: बेजबाबदार वागणाऱ्या महापौरांनी राजीनामा द्यावा: माजी महापौर मंगला कदम

Pckhabar- पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे  सोमवारी एका सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये महापौर ढोरे या मास्क न वापरता वावरल्या. या कार्यक्रमामध्ये स्वत: महापौरांनीच कोरोना विषयक शासनाच्या आदेशाचा भंग केला. शहरातील सर्वसामान्य नागरीकांना मास्क परीधान केला नाही तर त्याला मनपा प्रशासन ५०० रुपये दंड करते आता शहराच्या प्रथम नागरीक असणा-या महापौर यांच्यावरदेखील सर्वसामान्य नागरीकांप्रमाणेच कारवाई करण्यात यावी, व महापौरांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा अशी मागणी माजी महापौर मंगला कदम मंगळवारी केली.

कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की,पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व मनपा प्रशासन विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवित आहेत. त्याच बरोबर कोरोना टाळण्यासाठी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे व  वारवांर हात धुणे याबाबत जनजागृती करत आहे. तसेच शहरातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा प्रशासन व पोलिस प्रशासन शहरातील सर्व सामान्य जनतेवर कडक निर्बध घातले आहे. मास्क न वापरणा-या नागरीकांना ५०० रुपये दंड वसूल करण्यात येत आहे.

लग्न, समारंभास मोजक्या नातेवाईकांसह करण्यास परवानगी दिली जात आहे. बंदिस्त सभागृहामध्ये क्षमतेपेक्षा फक्त ५० टक्केच उपस्थितांची संख्या ठेवण्याचे बंधन घालत आहे. तसेच सभागृहामध्ये मास्क घालणे अनिवार्य केले आहे. सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक केले आहे. सँनिटायझरची व्यवस्था, थर्मल गन असणे अनिवार्य केले आहे. तसेच मनपा प्रशासनाकडून  कोविड सेंटर सज्ज ठेवण्याचे आदेश दिले गेले आहेत.  कोरोनाच्या दुस-या लाटेशी लढण्यासाठी राज्य सरकार, मनपा प्रशासन व पोलिस प्रशासन युध्द पातळीवर प्रयत्न करीत आहे.

या पार्श्वभूमीवर शहराच्या प्रथम नागरीक असलेल्या जेष्ठ  महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी  काल आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये स्वत: महापौरांनीच कोरोना विषयक शासनाच्या आदेशाचा भंग केला त्यांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांच्यासह भाजपच्या एकाही पदाधिका-यांनी मास्क परीधान केला नाही, सभागृहामध्ये सोशल डिस्टंन्स न पाळता सभागृहाच्या क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झालेली होती. या कार्यक्रमास भाजपचे प्रमूख पदाधिकारीही उपस्थित होते परंतु एकाही पदाधिका-यांनी मास्क परीधान केला नव्हता. शहरात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी साहित्य खरेदीमध्ये भाजपने भष्ट्राचार केला व आता कोरोना प्रसार करण्यासही भाजपचे महापौर व पदाधिकारीही जबाबदार आहेत.

शहरातील सर्वसामान्य नागरीकांना मास्क परीधान केला नाही तर त्याला मनपा प्रशासन ५०० रुपये दंड करते आता शहराच्या प्रथम नागरीक असणा-या महापौर यांच्यावरदेखील सर्वसामान्य नागरीकांप्रमाणेच कारवाई करण्यात यावी, व नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा. तसेच या कार्यक्रमात ज्या भाजपच्या नगरसदस्यांनी मास्क परीधान केला नव्हता त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *