Sangli News: सांगलीत जयंत पाटलांनी केला भाजपचा कार्यक्रम !

Sangli News: सांगलीत जयंत पाटलांनी केला भाजपचा कार्यक्रम !
Pckhabar- सांगली मिरज कुपवाड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी विजयी झाले आहेत. दरम्यान, यापुर्वी या महापालिकेत भाजपचा महापौर होता.

सांगली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक आज पार पडली. भाजपकडे असणारी ही महापालिका काँग्रेस -राष्ट्रवादी कडे जाणार का याकडे संपूर्ण दक्षिण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. पण, अखेर आज मतदान प्रक्रिया पार पडली आणि राष्ट्रवादीने सत्ता खेचून आणली.

राष्ट्रवादीच्या दिग्विजय सूर्यवंशी यांना 39 मतं पडली  तर भाजप च्या धीरज सूर्यवंशी यांना 36 मतं मिळाली. दिग्विजय सूर्यवंशी यांनी धीरज सूर्यवंशी यांचा 3 मतांनी पराभव केला.  भाजपची सहा मत फुटली तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले.

सांगली महापालिकेत भाजपकडे 43 काँग्रेस 19 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 नगरसेवक आहेत. तरीही महापौरपदासाठी राष्ट्रवादीचे पारडं जड होतं. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री विश्वजित कदम या सगळ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर जयंत पाटलांनी चाणक्यनिती दाखवून भाजपचा कार्यक्रम केला आहे. हा भाजपचा पराभव नसून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाच पराभव असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *