Wakad crime news: 50 हजारांची लाच स्वीकारताना पोलिसाला रंगेहाथ पकडले

 

Wakad crime news: 50 हजारांची लाच स्वीकारताना पोलिसाला रंगेहाथ पकडले
Pckhabar- दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकेची प्रक्रीया करून जामिनावर सोडण्यासाठी व गुन्हयाचे दोषारोपपत्र लवकर पाठविण्यासाठी दोन लाखांच्या लाचेची मागणी करून 50 हजार रुपये ल च स्वीकारणाऱ्या पोलिसाला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई वाकड पोलीस ठाण्यात आज सोमवारी करण्यात आली.

सचिन कुबेर जाधव (वय ३७) असे लाच स्वीकारणाऱ्या पोलीस नाईकाचे नाव आहे.

अॅन्टी करप्शन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांच्या विरुद्ध भा.द.वि. कलम ४९८ अ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे. अटकेची प्रक्रीया करून जामिनावर सोडण्यासाठी व गुन्हयाचे दोषारोपपत्र लवकर पाठविण्यासाठी दोन लाख रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १ लाख रूपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यापैकी ५० हजार रूपये लाच स्वीकारताना आरोपी सचिन जाधवला रंगेहाथ पकडले.

वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *