Dehu News: अभंग प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरात 141 जणांचा सहभाग

Dehu News: अभंग प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरात 141 जणांचा सहभाग
Pckhabar-जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा व शिवजयंतीचे औचित्य साधून अभंग प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात 141 जणांनी रक्तदान केले.

देहूतील हनुमान मंदिर, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात सकाळी ९ ते दु.३ या वेळेत हे शिबिर पार पडले.

कोरोनाच्या संकट काळात सर्वत्र रक्ताची नितांत गरज भासत आहे. सर्व रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमरतरता भासत आहे. या उद्देशाने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *