Maharashtra News: शिस्त पाळा, लॉकडाऊन टाळा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Maharashtra News: शिस्त पाळा, लॉकडाऊन टाळा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्यापासून सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम, आंदोलनाला बंदी

Pckhabar- महाराष्ट्रातील विविध शहरात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. नागरिकांना लॉकडाऊन नको असेल तर मास्क घालणे, सुरक्षित अंतर राखणे, सॅनिटाइजरचा वापर करावा. शिस्त पाळा, लॉकडाऊन टाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. तसेच उद्यापासून सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम, आंदोलन, यात्रा यांना राज्यात काही दिवसांसाठी बंदी घालण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

10 दिवसातील परिस्थिती पाहून लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार

 

लॉकडाऊन टाळण्यासाठी कोरोना रोखण्याच्या त्रिसूत्रीचा वापर करा. येत्या काळात तुमच्या वागण्यातून या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. लॉकडाऊन नको असेल तर मास्क लावा, नियम पाळा

‘मी जबाबदार’ या नव्या मोहिमेला सुरुवात करायची आहे.

गर्दी टाळण्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलण्याचा विचार करा

• गर्दी करणार्या आंदोलनांवरही बंदी

• नियम पाळले नाहीत तर लॉक़डाऊन पुन्हा कडक

उद्यापासून सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम, आंदोलन, यात्रा यांना राज्यात काही दिवसांसाठी बंदी

• कार्यक्रमाला जास्त गर्दी करू नका, मास्क घाला.

ही बंधने असतानाही विकासकामे सुरूच होते. आता तेथेही बंधने येणार आहेत.

अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये उद्या संध्याकाळ पासून बंधने लागू होणार

ही परिस्थिती बघता काही अटी आणि बंधने घालप गरजेचे आहे.

दुसरी लाट दरवाज्यावर धक्का मारतेय

• राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय,सध्या

राज्यात 53 हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत

• मंत्रीमंडळातील माझे सहकारीही बाधित होत आहेत

अमरावती सध्या कोरोनाचा कहर आहे. ही परिस्थिती वाईट आहे.

• कोरोनाच्या वाढत्या काळात जी परिस्थिती होती, तीच परिस्थिती आज आहे. ही चिंतेची बाब आहे.

• आपण योद्धे होत नसलो तरी कोव्हिडदूत बनू नका, सामाजिक भान ठेवा

• त्यांच्या मेहनतीवर आता आपण पाणी फिरवायचं नाही.

योद्ध्यांनी अहोरात्र मेहनत केली,. स्वत:चे जीव गमावले. ते शहीद झाले

• राज्यात काही दिवसांपूर्वी २ हजार रुग्ण सापडत होते. चांगलं वातावरण होतं. ही आपल्या कोव्हिड योद्ध्यांची मेहनत होती

आज आपल्या राज्यात ६९७१ रुण आढळले • अर्थचक्राला गती देत असताना पुन्हा कोरोनाने डोकं काढलं

सध्या लॉकडाऊन फक्त कागदावर उरलेला आहे

हॉटेल्स, हॉल्स, थिएटरमध्ये आपण नियमावली कडक केली आहे. इथे नियम मोडले तर मालकावरती कारवाई करणारच

• विनामास्क फिरणार्यांवरही कारवाई करण्यात येत

आहे नियमावली मोडणायांवर कठोर कारवाई करणार

कोरोना रोखण्यासाठी नियमावली अधिक कडक केली आहे.

बंधने, क्वॉरंटाईन कोणालाही आवडत नाही, मात्र, साथ रोखण्यासाठी हे गरजेचे आहे

• 100 वर्षांपूर्वी सॅनिश फ्लू रोखण्यासाठीही हेच तंत्र वापरण्यात आले होते.

• कोरोना रोखायचा असेल तर संपर्क टाळणे हाच यावर प्रभावी उपाय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *