Pimpri Corona news: आज शहरात पुन्हा कोरोना रुग्ण संख्या दोनशे पार

Pimpri Corona news: आज शहरात पुन्हा कोरोना रुग्ण संख्या दोनशे पार
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्येचा दररोज आकडा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. शनिवारी कोरोनाचे 207 नवे रूग्ण आढळले.  दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  तर 34 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात शनिवारअखेर 1 लाख 2 हजार 900 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 98 हजार 199 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 830 तर हद्दीबाहेरील 771 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारी 1 हजार 277 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 777 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 1 हजार 232 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 340 घरांना भेटी देऊन 907 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *