Dehu News: अभंग प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

Dehu News: अभंग प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन
Pckhabar-जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा व शिवजयंतीचे औचित्य साधून अभंग प्रतिष्ठानतर्फे उद्या (रविवार) देहूगावमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे १२ वे वर्ष आहे.

देहूतील हनुमान मंदिर, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात सकाळी ९ ते दु.३ या वेळेत हे शिबिर होणार आहे.

कोरोनाच्या संकट काळात सर्वत्र रक्ताची नितांत गरज भासत आहे. सर्व रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमरतरता भासत आहे. यासाठी या रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. या सद्कार्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अभंग प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *