Maharashtra News: नरेंद्र मोदी यांनीच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले; चंद्रकांत पाटील यांचे अजब विधान

Maharashtra News: नरेंद्र मोदी यांनीच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले; चंद्रकांत पाटील यांचे अजब विधान

Pckhabar- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं होतं, असा दावा त्यांनी केला आहे.

पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या युवा मोर्चाच्या वॉरिअर्स कार्यक्रमात त्यांनी हे अजब वक्तव्य केलं.

“नरेंद्र मोदी यांनी सर्व मुस्लिमांना प्राधान्य दिलं. त्यांनी एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं. ते काय मुस्लीम होते म्हणून त्यांना बाजूला ठेवलं नाही. एक कर्तुत्ववान म्हणून, एक संशोधक म्हणून त्यांना राष्ट्रपती केलं,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

मात्र, अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना कलाम राष्ट्रपती झाले होते. 2002 ते 2007 या कालावधीत कलाम राष्ट्रपती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *