Pimpri Corona News: नागरिकांनो गाफील राहू नका; कोरोना वाढतोय
Pckhabar-पिंपरी- चिंचवड शहरात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सातत्याने कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. बुधवारी तर गेल्या महिन्याभरानंतर प्रथमच 235 कोरोनाचे नवे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता मास्क, सुरक्षित अंतर ठेवावे, अन्यथा पुन्हा कडक निर्बंध लागण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र, बुधवारी एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही हे दिलासादायक आहे. तर फक्त 34 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात बुधवारअखेर 1 लाख 2 हजार 237 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 98 हजार 67 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 827 तर हद्दीबाहेरील 771 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी 2 हजार 168 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले.
1 हजार 553 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 1 हजार 261 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 456 घरांना भेटी देऊन 1 हजार 389 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.










Leave a Reply