Dehu News : माळीनगरमध्ये गणेश जयंती उत्साहात साजरी
Pckhabar- माळीनगरचा विघ्नहर्ता संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठानच्या वतीने गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
माळीनगर येथील संत शिरोमणी सावतामाळी महाराज विठ्ठल रखुमाई मंदीरात श्री गणेश जयंती निमित्ताने कीर्तनकार ह भ प प्रसाद महाराज माटे चर्होलीकर यांचे सुश्राव्य किर्तन येथे पार पडले. त्यांना साथसंगत पखवाज – हभप श्रीहरी महाराज क्षीरसागर, गायन – हभप ओमकार महाराज काब्रा, गायन – हभप नाना महाराज सुद्रीक यांनी केले.

गणेश जयंतीनिमित्त सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत श्रींचा महापूजा करण्यात आली. सायंकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात आले. हभप प्रशांत महाराज मोरे, हभप जालिंदर महाराज काळोखे, हभप अयर सर, ह भप संदीप पडवळ आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक अखिल वारकरी महामंडळाचे हवेली तालुका संपर्क प्रमुख चंद्रशेखर गुलाब परंडवाल यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन माळीनगरचा विघ्नहर्ता संत शिरोमणी सावतामाळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच भाजपचे शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल यांनी केले होते.








Leave a Reply