Advertisement

Dehu BJP News: भाजपतर्फे पं.दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन
Pckhabar- भारतीय जनसंघाचे संस्थापक महासचिव, अंत्योदय-एकात्म मानव दर्शनाचे प्रणेते, प्रखर राष्ट्रचिंतक पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष देहू – देहूरोड शहरच्या वतीने “समर्पण दिन” म्हणून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनानी झाली जगद्गुरु संत तुकाराम महाराज व पं.दीनदयाळजी यांची प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
देहूरोड भाजपचे सरचिटणीस तुकाराम जाधव यांनी मार्गदर्शन करताना पं दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रखर हिंदुत्ववादाचे दाखले दिले.
याप्रसंगी उपाध्यक्ष बाळासाहेब काळोखे,
देहूगाव भाजपचे शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल, संतोष हगवणे, प्रकाश मोरे, सुजाता माने, सागर मुसूडगे, संजय जंबुकार, संतोष चव्हाण, प्रविण कांबळे, गणेश खंडागळे, सोनाली ताई घोडेकर, सचिन काळोखे, सुदाम कांबळे, सोमा शेळके, अभिजीत शिंदे, पोपट पवार, अभय पडोस्कर, कुमार भोसले, ई मान्यवरांच्या उपस्थित होते.
सौरभ शिंदे ( युवक अध्यक्ष विमुक्त भटक्या जमाती जाती पश्चिम महाराष्ट्र), कैलास आण्णा पानसरे, लहु मामा शेलार अध्यक्ष विश्वनाथ भेगडे माथाडी कामगार संघटना (राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रमराज्य परीषद), उमाशंकर सिंग (संयोजक उत्तर भारतीय आघाडी महाराष्ट्र), बाळासाहेब शेलार (अध्यक्ष देहूरोड भाजपा), सोनाली घोडेकर (राष्ट्रीय सचिव नरेंद्र मोदी विचार मंच) आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात नवनियुक्त युवक अध्यक्ष विमुक्त भटक्या जाती जमाती सौरभ शिंदे यांचा देहू शहर भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला. पोपट पवार यांची देहू शहर भटक्या जाती जमाती अध्यक्ष पदी निवडीचे पत्र देण्यात आले. सुजाता माने यांची देहू शहर महिला अध्यक्ष पदी निवड तसेच नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
देहूगाव भाजपचे शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन युवा मोर्चा सरचिटणीस गणेश खंडागळे यांनी केले तर आभार देहू शहर कर्याधक्ष प्रकाश मोरे यांनी मानले.
पसायदानाने ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.










Leave a Reply