Maharashtra News: कोरोना पुन्हा वाढतोय ; अजित पवार यांच्याकडून लाॅकडाऊनचे संकेत
Pckhabar- राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून आल्याने राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोललं जात आहे. कारण तसे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत.
“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुणीही मास्क घालत नाही हे अत्यंत गंभीर आहे. याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागेल”, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.
उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. त्यात कदाचित काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं अजित पवार यांनी म्हटले आहे. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन ते अडीच हजारांदरम्यान होती. ती आता 4 हजारांवर जाऊन पोहोचली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे, तिथं कडक पावलं उचलली पाहिजे. करोना नियंत्रण करू शकलो नाही तर मग लॉकडाऊनच्या निर्णयाला जावं लागतं. ते आपणाला जायचं नाहीये. त्यामुळे कोरोना नियंत्रणात कसा राहिल, याकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे.










Leave a Reply