Chinchwad news: राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘कुणी तरी हवं‘ एकांकिका प्रथम

 

 

Chinchwad news: राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘कुणी तरी हवं‘ एकांकिका प्रथम
  Pckhabar- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा आयोजित कै. राम गणेश गडकरी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत बी.एम.सी.सी. पुणे या संघाच्या ‘‘कुणी तरी हवं  या एकांकिकेस प्रमुख पाहुणे अभिनेते योगेश सोमण, अमित गोरखे आणि अ.भा.म.नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले.
    याप्रसंगी अ.भा.म. नाट्य परिषद, तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे,  अ.भा.म. नाट्य परिषद, शिरूर शाखेच्या अध्यक्षा  दिपाली शेळके, तृप्ती धनवटे, कलारंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित गोरखे, मधु जोशी, बाळासाहेब शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
    भाऊसाहेब भोईर म्हणाले कि, पिंपरी चिंचवड शहराच्या औद्योगिक विकासाबरोबरच सांस्कृतिक विकास होणे देखील गरजेचे आहे, हे लक्षात घेऊनच पिंपरी चिंचवड शहरात नाट्य परिषदेची शाखा स्थापन करण्यात आली. या नगरीतून मुक्ता बर्वे, सोनाली कुलकर्णी यांसारखे गुणी कलाकार महाराष्ट्राला मिळाले. शहराला श्री मोरया गोसावी यांचा आशिर्वाद असल्याने कितीही अडचणी आल्या तरी हि सांस्कृतिक चळवळ उत्तरोत्तर वाढतच गेली. यंदा परिषदेचे रौप्यमहोत्सवी वे वर्ष असल्याने वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्याचा मानस आहे.
    कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश सोमण म्हणाले कि, एकांकिके मुळेच आज दर्जेदार कलाकार, लेखक, दिग्दर्शक घडत आहेत. अंदाजे पन्नास पेक्षा जास्त एकांकिका स्पर्धा महाराष्ट्रात वर्षभरात होत असतात. या स्पर्धांमध्ये भाग घेतांना प्रत्येकानं या एकांकिका बघीतल्या पाहिजेत. त्यातूनच आपण शिकत असतो. यात लेखन, अभिनय, दिग्दर्शन या सर्व गोष्टींचा कस लागतो. यातूनच आपण तावून  सुलाखून निघतो. बक्षीस मिळाले कि आयोजक चांगले आणि नाही मिळाले कि वाईट असे कधीही नसते; तर आयोजक कधीच त्या बाबतीत हस्तक्षेप करीत नाहीत, असा माझा अनुभव आहे. दर्जेदार एकांकिकांमुळे जसे दर्जेदार कलाकार मिळाले तसे दर्जेदार प्रेक्षकही मिळाले. आयोजकांनी स्पर्धा आयोजित करतांना शक्यतो सायंकाळच्या वेळेत कराव्यात यामुळे प्रेक्षकांनी एकांकिका बघण्याची संधी मिळते आणि प्रेक्षकवर्गाच्या टाळ्या आणि प्रोत्साहनामुळे कलाकारांना सादरीकरनासाठी हुरूप येतो.
    या स्पर्धेचे यंदाचे हे 22 वे वर्ष असून यातच स्पर्धेची व्यापकता दिसून येते. हि स्पर्धा अशीच वर्षानुवर्षे पुढे चालत राहो आणि दर्जेदार कलाकार या एकांकिका स्पर्धांतून निर्माण होत राहो, अशा शुभेच्छा सोमण यांनी दिल्या.
     संपूर्ण स्पर्धेचे परीक्षक म्हणून अशोक कार्लेकर, सतीश शेंडे, आणि यशोधन गडकरी यांनी काम पहिले. सूत्रसंचालन रुपाली पाथरे यांनी केले. आयोजन  सुहास जोशी, किरण येवलेकर, नरेंद्र आमले, संतोष शिंदे, महेश लाकाळ, नितीन शिंदे, राजू बंग, गौरी लोंढे यांनी केले.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *