PCMC News: आता पिंपरी महापालिकेत चालणार पाटीलकी!

PCMC News: आता पिंपरी महापालिकेत चालणार पाटीलकी
Pckhabar- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा राजेश पाटील यांनी आज सोमवारी मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून पदभार स्विकारला आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची पुण्यात मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक पदी बदली केली आहे. त्याच्या जागी राजेश पाटील यांची आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. पाटील यांनी आज सकाळी हर्डीकर यांच्याकडून आयुक्त पदाचा पदभार स्विकारला आहे. आज दुपारी चार वाजता पाटील प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *