Dehu News: कविता पाठविण्याचे आवाहन

Dehu News: कविता पाठविण्याचे आवाहन
Pckhabar-इंद्रायणी आहे साक्षीला कवीमंच देहूद्वारे दि. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी मराठी राजभाषा दिनानिमित्त होणाऱ्या मासिक मराठी कविसंमेलनासाठी कविता पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

देहू पंचक्रोशीतील तसेच पिंपरी चिंचवड शहर परिसरातील नवोदित कवींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने गेले वर्षभर मासिक कविसंमेलन इंद्रायणी नदीच्या तीरावर, गाथा मंदिर परिसरातील घाटावर आयोजित करण्यात येत आहे, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. इंद्रायणी नदीच्या तीरावरून दिसणाऱ्या सूर्यास्ताच्या रम्य प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर हे कविसंमेलन रंगत असल्याने साहित्य प्रेमींसाठी हि मोठी पर्वणी ठरते.

यंदाचे फेब्रुवारी महिन्यातील संमेलन हे मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आले आहे. यात सहभागी होण्यासाठी कवींना एक स्वरचित कविता लिखित स्वरूपात ९८२२५५८९६७ या नंबरवर २० फेब्रुवारी २०२१ पर्यंत व्हॉट्सअप करण्याचे आवाहन, कवी मंचाचे संस्थापक डॉ. अहेफाज मुलाणी यांनी केले आहे.

“इंद्रायणी आहे साक्षीला!” या मासिक मराठी कविसंमेलनात सहभागी होण्यासाठी वय अथवा विषयाचे कुठलेही बंधन नसून सर्वांसाठी प्रवेश मोफत आहे, निवडलेल्या कवितांच्या सादरीकरणासाठी कवींना मात्र देहूत प्रत्यक्ष उपस्थित रहावे लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *