Chinchwad news: थेरगाव बोट क्लब पूर्ण क्षमतेने सुरू
Pckhabar- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे थेरगाव येथील केजूबाई उद्यान आणि थेरगाव बोट क्लब नागरीकांसाठी पूर्ण क्षमतेने खुले करण्यात आले आहे.
कोरोना महामारीमुळे गेल्या ११ महिन्यापासून हे बोट क्लब बंद ठेवण्यात आले होते. थेरगाव बोट क्लब हे पुणे शहरातील एकमेव बोटिंगचा आनंद घेण्याचे ठिकाण आहे. बोट क्लब मध्ये २० पेडल बोट तर १४ सिटर ची एक मोटर बोट पर्यटकांच्या सेवेस सज्ज आहे. हे उद्यान शहरातील सर्वाधिक सुंदर व आकर्षक आहे. सकाळी ११ ते ६ या वेळेत उद्यान खुले राहणार आहे. या उद्यानामध्ये लहान मुलांचे आकर्षण असलेली झुकझुक गाडी देखील सुरू करण्यात आली आहे. कोरोना पूर्णपणे न संपल्याने येणाऱ्या नागरीकानी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असल्याची सूचना पालिकेने केले आहे.
कोरोना काळात नागरीकांच्या मनावर आलेले मळभ दूर करण्यासाठी या उद्यानाचा एकावेळ नक्कीच आनंद घ्यावा. असे आवाहन सनी बोट क्लबचे संचालक सनी सॅबेस्टीयन यांनी केले आहे.










Leave a Reply