Pune News: शरद पवार यांच्या अगोदरच पडळकरांनी केले अहिल्याबाईंच्या पुतळ्याचे अनावरण
Pckhabar-जेजुरी गडावरील अहिल्याबाईंच्या पुतळ्यांचं उद्घाटन करण्यात आलेलं असून, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन उद्या होणार होते, मात्र त्या आधीच शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं उद्घाटन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी मेंढपाळांच्या हस्ते केलंय.
गेल्या काही दिवसांपूर्वीच हा पुतळा उभा करण्यात आला होता. जेजुरी गडावरील अहिल्याबाईंचा पुतळा वर्षभरापूर्वीच तयार झाला होता. पण कोरोनाचा काळ असल्यानं त्याचं उद्घाटन रखडलं होतं. शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार होतं.
यावेळी आमदार पडळकर म्हणाले
शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून या पुतळ्याचं उद्घाटन होऊ नये, अहिल्यादेवींचं काम बहुजन आणि इतर सगळ्यांसाठी होतं. त्यामुळे पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये. म्हणून आम्ही पुतळ्याचे अनावरण केले.










Leave a Reply