Crime News: मुलगी झाल्यामुळे विवाहितेचा छळ
Pckhabar-मुलगी झाल्यामुळे विवाहितेचा सासरच्या मंडळींनी शारिरीक आणि मानसिक छळ करत शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली. याप्रकरणी सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती अमरदिपसिंह मख्खनसिंग सोडी, सासू बलबीरकौर मख्खनसिंग सोडी,सासरे मख्खनसिंग सोडी, नणंद हरप्रितकौर सिंधाना (सर्व रा. पिंपळे सौदागर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना मुलगी आहे. तसेच त्यांच्या पतीचे इतर मुलीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाबाबत विचारणा करत त्यांना व्यवस्थित वागणूक देण्याबाबत नोटरी करून घेतल्याचाही आरोपींना राग होता. यामुळे फिर्यादी यांना आरोपींनी शारिरीक आणि मानसिक छळ करत शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. फौजदार केंगार तपास करत आहेत.
Crime News: मुलगी झाल्यामुळे विवाहितेचा छळ










Leave a Reply