Chinchwad sports news : तुषारभाऊ हिंगे स्पोर्टस संघ ठरला आमदार चषकाचा मानकरी

Chinchwad sports news : तुषारभाऊ हिंगे स्पोर्टस संघ ठरला आमदार चषकाचा मानकरी
Pckhabar-चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त नामदेव ढाके स्पोर्ट फौंडेशनच्या वतीने डे नाईट आमदार चषक 2021 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत तुषारभाऊ हिंगे स्पोर्टस क्लब संघ अंतिम सामन्यात विजय मिळवत चषकाचा मानकरी ठरला. श्री काटे स्पोर्टस, पुनावळे हा संघ उपविजेता ठरला.
विजेत्या संघास करंडक  रोख 1,51,111 रूपये, उपविजेत्या संघास रोख 1,01,111, तर एजे थंडर, चिखली तृतीय तर क्रेजी ईलेव्हन, वाल्हेकरवाडी या संघाला चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यांना अनुक्रमे करंडक व र.रु. 61,111/- , र.रु. 31,111/- वितरित करण्यात आले. तसेच स्पर्धेचा मानकरी प्रशांत शुक्ला ठरला. स्पर्धेचे समालोचन मनोज बेल्हेकर व राहुल बोंबे यांनी केले. मदनलाल धिंग्रा मैदान, से. 25, निगडी प्राधिकरण येथे दि. 06 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2021 या कालावधीत स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. या पाच दिवशीय स्पर्धेत 32 संघानी सहभाग नोंदवला.
आमदार चषक 2021 क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ   माजी नगरसेवक शंकर जगताप यांचे हस्ते पार पडला. शहरासाठी मर्यादित व शहरातील खेळाडुंना प्रोत्साहन मिळण्यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती स्पर्धेचे आयोजक तथा सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजु मिसाळ, क्रीडा सभापती प्रा. उत्तम केंदळे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, माजी उपमहापौर तुषार हिंगे, माजी सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.  
आमदार चषक 2021 स्पर्धेचे संयोजन शुभम ढाके, दर्शन महाजन, रविंद्र ढाके, कैलास रोटे, प्रदिप पटेल, शंकर पाटील, माऊली जगताप, योगेश महाजन, कुणाल इंगळे, भगवान निकम, दिपक महाजन, रुपेश पाटील, भुषण पाटील, वसंत नारखेडे, प्रदिप ढाके, संजय माळी, संदिप महाजन, एकनाथ सरोदे, प्रदिप नेहते यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *