Talegaon Dabhade crime news: जुन्या भांडणातून चहा विक्रेत्यावर तलवारीने वार

Talegaon Dabhade crime news: जुन्या भांडणातून चहा विक्रेत्यावर तलवारीने वार
Pckhabar- जुन्या भांडणातून एका चहा विक्रेत्याला पाच जणांच्या टोळक्यांनी कोयता, तलवारीने डोक्यावर, मानेवर, हातावर, पाठीवर, पायावर वार करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजता तळेगावातील जिजामाता चौकात घडली.
सुरज नितीन टेकवडे (वय-28, रा. शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे) असे गंभीर जखमी झालेल्या चहा विक्रेत्याचे नाव आहे. त्याने तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मंगेश हिरे आणि त्याच्या चार साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिजामाता चौकात फिर्यादी सुरजचे टेकवडे अमृततुल्य नावाने चहाचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी आरोपी चहाच्या दुकानावर आले. जुन्या भांडणातून आरोपींनी फिर्यादीच्या मानेवर, दोन्ही हातावर, पाठीवर, बोटावर कोयता आणि तलवारीने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच दुकानासमोर दहशत माजविण्याचा प्रयत्न करून आरोपी दुचाकीवरून पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक अतिग्रे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *