Wakad crime news: लग्न मोडल्याच्या रागातून तरूणीचा विनयभंग, कुटुंबियांना धमकी

 

Wakad crime news: लग्न मोडल्याच्या रागातून तरूणीचा विनयभंग, कुटुंबियांना धमकी
Pckhabar- लग्न मोडल्याच्या रागातून तरूणाने तरूणीचा पाठलाग करून विनयभंग करत तिच्या कुटुंबियांना शिवीगाळ केली. तसेच धमकी देत तिच्या होणार्‍या नवर्‍याला इन्स्टाग्रामवरून बदनामीकारक मॅसेज पाठविला. हा प्रकार वाकड येथे नुकताच उघडकीस आला आहे.

बॉनी पिल्ले (रा. देवळाली कॅम्प, नाशिक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 24 वर्षीय तरूणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी बॉनी यांचे लग्न मोडले होते. आरोपीला भेटण्यास नकार दिल्याने त्याने  फिर्यादी यांचा पाठलाग केला. त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच तरूणीच्या होणार्‍या नवर्‍याला इन्स्टाग्रामवरून फिर्यादीबद्दल बदनामीकारक मॅसेज पाठविला. वाकड पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *