Pune news : चक्क ईडीलाच धाडली नोटीस!
Pckhabar- अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने देशातील दिग्गजांना नोटीस पाठवल्याच्या घटना सध्या घडत आहेत. मात्र, ईडीलाच नोटिस पाठविल्याची घटना प्रथमच घडली आहे.
पुण्यातील वकील असीम सरोदे यांनी ईडीलाच नोटीस धाडली आहे. झेरॉक्सचे 1 हजार 440 रूपये देण्याबाबत असीम सरोदेंनी ही नोटीस पाठवली आहे.
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कथित भूखंड घोटाळ्याची चौकशी ईडी करत आहे. ईडीने त्यासाठी तक्रारदार अंजली दमानिया यांचे वकील असीम सरोदे यांची मदत घेतली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही हजार कागदपत्रांची माहिती असीम सरोदे यांच्या कार्यालयातून घेतली होती. कागदपत्रांच्या झेरॉक्सचा खर्च हा ईडीला द्यावा लागेल, अशी अट असीम सरोदेंनी घातली होती. ते ईडीने मान्यही केलं होतं. पण ईडीने अजूनही त्यांचे 1 हजार 440 रुपये दिलेले नाहीत. त्यामुळे असीम सरोदेंनी चक्क ईडीलाच नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये त्यांनी थकीत पैशांची मागणी केली आहे.
ईडीच्या अधिकृत मेलवरती बिलाची प्रत देऊनही ईडीनं त्यांचे पैसे जमा केलेले नाहीत. त्यामुळे सरोदेंनी ईडीलाचा नोटीस पाठवल्यावरती आता ईडी त्यांच्या नोटीसला काय उत्तर देते? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.










Umesh
Great, Adv Asim Sarode sir