Dehu news: श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम
Pckhabar- जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू यांच्या वतीने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा 13 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. या चार दिवसांत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ होणार आहे. त्यानंतर 7 ते 9 या कालावधीत ह. भ. प. पुरूषोत्तम महाराज पाटील यांची किर्तन सेवा होणार आहे.
14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता स्वरगंध संगीत सरिता-भक्तीगीत कार्यक्रम होणार आहे. तुषार केळकर, श्रवण बत्ते, शिवराज बत्ते हे सादरीकरण करणार आहेत. सायंकाळी 6 ते 7 या वेळेत हरिपाठ त्यानंतर ह. भ.प. योगीराज महाराज गोसावी यांची किर्तन सेवा होणार आहे.
15 फेब्रुवारी रोजी युथ क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धा होणार आहे. सायंकाळी 6 ते 7 वाजता हरिपाठ त्यानंतर ह.भ. प. माऊली महाराज नामदास यांची किर्तन सेवा होणार आहे.
16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता संत तुकाराम महाराज जन्माचे किर्तन ह. भ.प. आचार्य रामकृष्ण महाराज लहवितकर यांची किर्तन सेवा होणार आहे.













Leave a Reply