Bhosari news: वडमुखवाडी, मोशीत अनधिकृत बांधकामावर हातोडा

Bhosari news: वडमुखवाडी, मोशीत अनधिकृत बांधकामावर हातोडा
Pckhabar : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने वडमुखवाडी व मौजे मोशी परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. या कारवाईत एकूण 40 अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली.

सह शहर अभियंता मकरंद निकम यांच्या उपस्थितीत तसेच कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांचे नियत्रणाखाली उपअभियंता हेमंत देसाई, सुर्यकांत मोहित, सुधीर मोरे तसेच 5 शिष्ठ अभियंता व एकूण 35 बीट ऑफीसर तसेच कारवाईसाठी पोलीस विभागामार्फत डी. सी. पी सुधीर हिरेमठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, शिवाजी गवारे, 4 पी.आय. 5 पी.एस.आय व 42 पोलीस कर्मचारी यांचे उपस्थितीत कारवाई करण्यात आली.

या कारवाईसाठी 3 पोकलेन, 5 जेसीबी, 25 मजूर व महापालिकेचा अतिक्रमण विभागाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *