Pimpri News: कै.नंदा भोजने यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

Morwadi News: कै.नंदा भोजने यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Pckhabar- कै.नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त मोरवाडी येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मोरवाडी, म्हाडा  येथील एसएनबीपी स्कूल येथे झालेल्या या रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीराचे उद्घाटन पिपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी लक्ष्मण पांडुरंग गोफणे, नगरसेविका आशाताई शेंडगे -धायगुडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी  उद्योजक  विजयराज पिसे, डाॅ. दिनेश गाडेकर बीआरटी विभागाचे उपअभियंता विजय भोजने, डाॅ. संजीव शभूस, संतोष पांढरे, गजानन म्हैसने पाटील, सुनिल बनसोडे , जीवन पिसे , समाजिक कार्यकर्त्या रोहिणी रासकर ,  हिराकांत गाडेकर , गणेश एकल आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रक्तदान शिबिरात ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदान करणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले.२५ नागरिकांची नेत्र तपासणी, ८० नागरिकांची दंत तपासणी करण्यात आली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेणुका भोजने , कांचन भोजने, प्रथमेश भोजने , निरज भोजने, अर्थव भोजने, रजनीकांत  गायकवाड, यश गजबरे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे आयोजन दिपक भोजने मित्र परिवारा तर्फे करण्यात आले होते.

आयोजक दिपक भोजने म्हणाले ” आई कै.नंदा भोजने यांच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षी परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी नेत्र तपासणी, दंत तपासणीसह रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *