Pimpri crime news: अपहरण करून चिटफंड व्यावसायिकाचा खून; महाडमध्ये आढळला मृतदेह
Pckhabar- पाच दिवसांपुर्वी बेपत्ता झालेल्या चिटफंड व्यावसायिकाचे अपहरण करून खून केल्याचे उघड झाले आहे. व्यावसायिकाचा रायगडमधील महाड येथे मृतदेह आढळला आहे.
आनंद साहेबराव उनावणे (वय 45, रा. नर्मदा बिल्डींग, म्हाडा कॉलनी, मोरवाडी, पिंपरी) असे खून झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ विष्णू उनावणे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती.
पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीटफंडचा व्यवसाय असलेला भाऊ बेपत्ता असल्याची माहिती आनंद यांच्या भावाने पोलिसांना दिली. त्यानुसार बेपत्ता असल्याची पोलिसांनी फिर्याद घेतली. पोलिसांनी आनंद यांच्या मोबाइलचे कॉल डिटेल्स काढले आणि तपासाला सुरुवात केली. मात्र पोलिसांचा शोध सुरू असतानाच आनंद उनावणे यांचा मृतदेह महाड येथे पाण्यात आढळून आला. महाड पोलिसांनी पाठविलेले फोटो आणि फिर्यादी विष्णू यांनी पोलिसांना दिलेले फोटो यात साम्य वाटल्याने पिंपरी पोलीस आणि आनंद यांच्या नातेवाइकांना महाड येथे नेण्यात आले. नातेवाईकांनी मृतदेह आनंद यांचाच असल्याचे सांगितले. बेपत्ताची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या अँगलने तपास केला. आजही त्यांचा मोबाइल वेगळेच लोकेशन दाखवत आहे. तर मृतदेह वेगळ्या ठिकाणी मिळून आला असल्याचेही उपायुक्त मंचक इप्पर यांनी सांगितले.
दरम्यान, आनंद उनावणे यांचे अपहरण करून पैशांसाठी खून केला की अन्य काही कारणावरून केला, याचा पोलीस शोध घेत आहेत.
Pimpri crime news: अपहरण करून चिटफंड व्यावसायिकाचा खून; महाडमध्ये आढळला मृतदेह










Leave a Reply